डबलडेकर स्पंज केक
साहित्य - अंडी ४ (वजन अंदाजे २०० ग्रॅम), मैदा २५० ग्रॅम, बेकींग पावडर १ सपाट टीस्पून,साखर २५० ग्रॅम, मार्गरिन १८० ग्रॅम, दूध ३ टेबलस्पून, व्हॅनिला इसेन्स १ टीस्पून, कोको पावडर ३ टीस्पून किंवा इंस्टंट कॉफी पावडर ३ टीस्पून, कोणत्याही चवीचा जॅम ३ चमचे.
कृती -
१) ओव्हन चालू करून १८० अंशावर तापवावा.
१) ओव्हन चालू करून १८० अंशावर तापवावा.
२) केकच्या टीनला तळाला व बाजूने मार्गरिन लावून मध्यभागी एक बटरपेपरचा छोटा चौकोनी तुकडा लावावा.नंतर टीनमध्ये मैदा भुरभुरावा.मैदा टीनला सर्व बाजूने लागेल असे पहावे. ह्या केकसाठी २ टीन आवश्यक आहेत.
३) मैदा, बेकींग पावडर व मीठ एकत्र करुन तीनदा चाळून घ्यावा.
४) अंडी, मार्गरिन व साखर ह डमिक्सर किंवा इलेक्ट्रीक बीटर किंवा मिक्सर वापरुन साधारणपणे साखर विरघळेपर्यंत फेटावे. त्यात व्हॅनिला इसेन्स घालावा.
५) ह्या मिश्रणात चाळून घेतलेला मैदा, बेकिंग पावडर हळूहळू घालत एका दिशेने गोलाकार मिश्रण फेटावे म्हणजे गुठळया होणार नाहीत. मैदा घातल्यानंतर मिक्सर वापरू नये. हाताने लाकडी किंवा प्लॅस्टीकचा चमचा वापरून मिश्रण फेटावे.
६) अर्धे मिश्रण एका टीनमध्ये घालावे.
७) उरलेल्या मिश्रणावर कोको पावडर किंवा कॉफी चाळणीने शिंपडावी. नंतर चमच्याने सारखी ढवळावी.मग ते मिश्रण दुस-या टीनमध्ये घालावे.
८) तापलेल्या ओव्हनमध्ये हे दोन्ही केक्स भाजून घ्यावेत.
९) साधारण २० मिनीटानी सुरी किंवा विणकामाच्या सुई केकमध्ये घातली असता ती स्वच्छ बाहेर आली म्हणचे केक तयार झाला असे समजावे.
१०) केक तयार झाल्यावर सर्व बाजूनी सुरी फिरवून कडा सोडवून ध्याव्यात. तारेच्या जाळीवर टीन उपडा करावा. केक थंड होऊ द्यावा.
११) कोणताही आवडीचा जॅम एका वाटीत घेउन मंद आचेवर गरम करावा. गरम असतानाच एका केकवर सुरीने पसरावा व दुसरा केक त्यावर हलक्या हाताने दाबून चिकटवावा.
१२) नंतर त्याचे तुकडे कापावेत.
१३) दोन वेगवेगळया रंगांमुळे हा केक छान दिसतो. एकाच केकमध्ये दोन वेगवेगळे स्वाद असल्याने आयसिंगची आवश्यकता नाही.
कोकोनट केक
साहित्य - लोणी किंवा मार्गरिन २५० ग्रॅम, मैदा ५०० ग्रॅम, बेकींग पावडर १ टेस्पून, ब्राऊन शुगर २५० ग्रॅम, खोब-याचा बारीक कीस २०० ग्रॅम, अंडी २, गोड ताक किंवा दूध १/२ कप.
कृती -
१) ओव्हन चालू करून १८० अंशावर तापवावा.
१) ओव्हन चालू करून १८० अंशावर तापवावा.
२) मैदा व बेकिंग पावडर एकत्र करून चाळून झाकून ठेवावे.
३) मार्गरिन किंवा लोण्याचे तुकडे करून ते मैद्यात मिसळावे. मिसळताना फक्त बोटांची टोकेच वापरावी. मिसळून झाल्यावर ब्रेडच्या भुग्याप्रमाणे दिसले पाहिजे.
४) त्यात हलक्या हाताने साखर व खोबरे मिसळावे.
५) अंडी फोडून घुसळून त्यात मिसळावी.
६) त्यात ताक किंवा दूध घालून सारखे करावे.
७) केकच्या टीनला तळाला व बाजूला लोणी लावून त्यात मध्यभागी बटरपेपरचा तुकडा लावावा.त्यावर थोडा मैदा भुरभुरावा. मैदा टीनला सर्व बाजूनी लागला पाहिजे.
८) तयार मिश्रण टीनमध्ये घालून तापवून घेतलेल्या ओव्हनमध्ये १८-२० मिनीटे भाजावे.
९) केकच्या मध्यभागी सुरी घालून केक तयार झाला आहे का ते पहावे. केकचे मिश्रण सुरीला न चिकटल्यास केक तयार झाला असे समजावे.
१०) केक जाळीवर काढून थंड होऊ द्यावा.
पाऊंड केक
साहित्य - अंडी 4 (वजन अंदाजे 200 ग्रॅम), मैदा 200 ग्रॅम, बेकींग पावडर 1 सपाट टीस्पून, चिमूटभर मीठ, साखर 200 ग्रॅम, मार्गरिन 200 ग्रॅम, व्हॅनिला इसेन्स 1 टीस्पून
कृती -
1) ओव्हन चालू करून 180 अंशावर तापवावा.
1) ओव्हन चालू करून 180 अंशावर तापवावा.
2) केकच्या टीनला तळाला व बाजूने मार्गरिन लावून मध्यभागी एक बटरपेपरचा छोटा चौकोनी तुकडा लावावा.नंतर टीनमध्ये मैदा भुरभुरावा.मैदा टीनला सर्व बाजूने लागेल असे पहावे.
3) मैदा, बेकींग पावडर व मीठ एकत्र करुन तीनदा चाळून घ्यावा.
4) अंडी, मार्गरिन व साखर ह डमिक्सर किंवा इलेक्ट्रीक बीटर किंवा मिक्सर वापरुन साधारणपणे साखर विरघळेपर्यंत फेटावे. त्यात व्हॅनिला इसेन्स घालावा.
5) ह्या मिश्रणात चाळून घेतलेला मैदा, बेकिंग पावडर हळूहळू घालत एका दिशेने गोलाकार मिश्रण फेटावे म्हणजे गुठळया होणार नाहीत. मैदा घातल्यानंतर मिक्सर वापरू नये. हाताने लाकडी किंवा प्लॅस्टीकचा चमचा वापरून मिश्रण फेटावे.
6) हे तयार मिश्रण टीनमध्ये घालावे.
7) साधारण 20 मिनीटानी सुरी किंवा विणकामाच्या सुई केकमध्ये घातली असता ती स्वच्छ बाहेर आली म्हणचे केक तयार झाला असे समजावे.
8) केक तयार झाल्यावर सर्व बाजूनी सुरी फिरवून कडा सोडवून ध्याव्यात. तारेच्या जाळीवर टीन उपडा करावा. जाळीवर केक काढल्याने केकला दोन्ही बाजूनी हवा लागते. थंड झाल्यावर तुकडे कापावेत.
अॅपल केक
साहित्य - ३ मध्यम सफरचंद, पाणी ३ टीस्पून, मैदा २५० ग्रॅम, कोको पावडर १ टीस्पून, बेकींग पावडर १/४टीस्पून, सोडा १/२ टीस्पून, मीठ १/४ टीस्पून, लवंग, दालचिनी, जायफळ पूड (सर्व मिळून १ टीस्पून), अंडी २, मार्गरिन १२५ ग्रॅम, साखर १८० ग्रॅम, किसमिस ५० ग्रॅम
कृती -
१) ओव्हन चालू करून १८० अंशावर तापवावा.
१) ओव्हन चालू करून १८० अंशावर तापवावा.
२) मैदा व बेकिंग पावडर,कोको पावडर एकत्र करून चाळून झाकून ठेवावे.
३) सफरचंद धुवून मधला बिया व दांडा काढून घ्यावा. सफरचंदाचे ८ तुकडे करावे. त्यात पाणी घालून नरम होईपर्यंत शिजवून घ्यावे. नंतर मिक्सरमध्ये घालून घुसळून घ्यावे.
४) त्यात अंडी, मार्गरिन व साखर घालून घुसळून घ्यावे.
५) केकच्या टीनला तळाला व बाजूला लोणी लावून त्यात मध्यभागी बटरपेपरचा तुकडा लावावा.त्यावर थोडा मैदा भुरभुरावा. मैदा टीनला सर्व बाजूनी लागला पाहिजे.
६) तयार मिश्रण टीनमध्ये घालून तापवून घेतलेल्या ओव्हनमध्ये १८-२० मिनीटे भाजावे.
७) केकच्या मध्यभागी सुरी घालून केक तयार झाला आहे का ते पहावे. केकचे मिश्रण सुरीला न चिकटल्यास केक तयार झाला असे समजावे.
८) केक जाळीवर काढून थंड होऊ द्यावा.
९) हा केक पार्टीकरिता अगदी उत्तम आहे. २-३ दिवस आधी केला तरी चालतो. हवे असल्यास चॉकलेट सॉस वरून घालावा.
अननस-पनीर केक
साहित्य- दोन वाटी अननसाचे बारीक काप, दोन वाटी पनीर, १0-१२ मारीची बिस्किटं, दीड वाटी साखर, १00 ग्रॅम एग रिप्लेसमेंट पावडर, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स.
कृती- ‘केक टिन’ला लोणी लावून ग्रीस करावं. त्यावर मारीची बिस्किटं चुरा करून पसरावी, त्यावर अननसाचे तुकडे घालावे, भांड्यात पनीर घेऊन फेसावं, मऊ झाल्यावर त्यात साखर घालावी, साखर विरघळली की एग रिप्लेसमेंट पावडर घालावी. सर्व जिन्नस घोटून एकजीव करावे. त्यात व्हॅनिला इसेन्स घालावा. अननसावर हे मिश्रण सारखं पसरवावं. आधीच प्रि-हीट केलल्या ओव्हनमधे केक १८0 अंश डिग्रीवर ४५-५0 मिनिटे बेक करावा. केक झाल्यावर तो आधी गार होऊ द्यावा. सर्व बाजूंनी मोल्डमधून सुटा करून पसरट ताटात काढून घ्यावा.
ऑरेंज केक
साहित्य- एक मोठी संत्री, १५0 ग्रॅम मैदा, १५0 ग्रॅम पिठीसाखर, १५0 ग्रॅम लोणी, ७५ ग्रॅम एग रिप्लेसमेंट पावडर, एक टी स्पून बेकिंग पावडर आणि एक चमचा संत्र्याची साल (किसलेली).
कृती- मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र करून दोनदा चाळावी. लोणी व साखर एकत्र करून चांगलं फेसावं. संत्र्याचा रस काढावा, अंडी फेसावीत, लोणी व साखरेच्या मिश्रणात थोडा थोडा मैदा मिसळावा. नंतर त्यात एग रिप्लेसमेंट पावडर, संत्र्याचा रस आणि संत्र्याची किसलेली साल घालावी. हे साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यावं. केकपात्राला ग्रीस करून एकजीव केलेलं मिश्रण त्यात ओतावं. प्रि-हीट केलेल्या ओव्हनमध्ये केक १८0 अंशा डिग्रीवर ४0-४५ मिनिटे बेक करावा.
प्लम केक
साहित्य- २५0 ग्रॅम मैदा, एक चमचा बेकिंग पावडर, २५0 ग्रॅम लोणी, १00 ग्रॅम प्लम, ५0 ग्रॅम टुटीफ्रुटी, २00 ग्रॅम ब्राऊन शुगर, ५0 ग्रॅम मनुका, १00 ग्रॅम एग रिप्लेसमेंट पावडर, ८-१0 बदामाचे काप, एक लिंबाची किसलेली साल, अर्धा कप दूध, लवंग, अर्धा चमचा दालचिनी पूड आणि अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स.
कृती- लोणी व साखर एकत्र करून फेसावं. त्यात एग रिप्लेसमेंट पावडर घालावी आणि फेसावी. त्यात बारीक कापलेले प्लम (आलुबुखार), टुटी-फ्रुटी, बदामाचे काप, मनुका, लिंबाची किसलेली साल, लवंग-दालचिनी पूड, व्हॅनिला इसेन्स घालावं. सर्व साहित्य एकत्र करावं. मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावी. मैदा व दूध एकेक करून आळीपाळीनं वरील मिश्रणात घालावं. केक टिनला लोणी लावून त्यात सर्व मिश्रण ओतावं. प्रि-हीटेड ओव्हनमध्ये १८0अंश डिग्रीवर ठेवून केक ५0 मिनिटे बेक करावा.

No comments:
Post a Comment