बेसिक आईस्क्रीम:
साहित्य:
१/२
लिटर तापवून साय काढलेलं दूध,
२
टेबलस्पून कॉर्न फ़्लोर,
१
१/२ टीस्पून जी. एम एस पावडर,
१/८ टीस्पून अल्जिनेट पावडर,
साधारण ६ ते ८ टेबलस्पून साखर.
कृती:
दूधामध्ये
कॉर्न फ़्लोर, जी. एम एस आणि अल्जिनेट पावडर नीट मिसळून घ्यावे. मग त्यात साखर
घालून गॅसवर ठेवावे. सतत हलवत रहावे. यात अजिबात गुठळ्या जमता कामा नयेत. साधारण
उकळी आली आणि घट्टसर झाले की चुलीवरुन काढावे. हे मिश्रण मंद आचेवर शिजवावे. कॉर्न
फ़्लोर असल्याने बुडाशी लागण्याची शक्यता असते.
गॅस बंद करुन देखीव्हॅनिला आईस्क्रिम
साहित्य :
- अर्धा टिन कंडेन्स्ड मिल्क
- १ कप दुध
- २ कप ताजे क्रीम
- २ मोठे चमचे कॉर्नफ्लावर
- ६ मोठे चमचे साखर
- २ छोटे चमचे व्हॅनिला एसेंस
कृती : थोड्या दूधात कार्नफ्लावर मिसळा. एका भांड्यात दूध, कंडेन्स्ड मिल्क व साखर मिसळून घट्ट मिश्रण बनवा. त्यात कॉर्नफ्लावर टाका. सारखे हलवत रहा. घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. थंड झाल्यावर क्रीम व एसेंस मिसळून मिक्सर मध्ये फेटा व जमवायला फ्रीज मध्ये ठेवा.
साधे आईस्क्रीम
साहित्य : 2 लीटर दूध, 1/2 साखर, 4 मोठे चमचे कस्टर्ड पावडर, 2 मोठे चमचे कोको पावडर, 2 कप गाजर रस.कृती : एका भांड्यात दुधाला उकळत ठेवावे. त्यात साखर टाकून 10 मिनिट अजून उकळावे. नंतर दुधाला खाली उतरवून 3 भागात वेग वेगळे करावे. पहिल्या भागात कस्टर्ड पावडर मिसळून फ्रीजमध्ये ठेवावे. अर्धा तासानंतर ते थोडं जमण्यात येईल तेव्हा, दुसऱ्या भागात गाजराचा रस मिसळून ते मिश्रण कस्टर्डच्या वर घालून परत जमण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. अर्धा तासानंतर ते मिश्रण बाहेर काढून ठेवावे, उरलेल्या भागात कोको पावडर टाकून ते मिश्रणावर टाकावे आणि सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. जेव्हा आइसक्रीम पूर्णपणे जमेल तेव्हा बाहेर काढून त्याचे चौकोनी काप करून रंगीबेरंगी आइसक्रीम सर्व्ह करा.
मँगो आइसक्रीम
साहित्य:१ कप हेवी व्हिपींग क्रिम, थंडगार
२ कप आंब्याचा रस, थंडगार (मी रेडीमेड कॅन मधील साखर असलेला आंबा रस वापरला होता)
१/२ कप पिठी साखर
वेलचीपूड (ऐच्छिक)
कृती:
१) एक मध्यम आकाराचे खोलगट काचेचे बोल घ्या आणि १/२ तास फ्रिजमध्ये गार करण्यास ठेवा.
२) गार झालेले काचेचे बोल घेऊन त्यात गार व्हिपींग क्रिम घाला आणि हॅण्ड मिक्सरने जास्त स्पिडवर फेटा.
३) क्रिम थोडे फ्लफी व्हायला लागले कि २ ते ३ बॅचमध्ये साखर घालून फेटत राहा. क्रिम व्यवस्थित फ्लफी झाले कि फेटणे थांबवावे. गरजेपेक्षा जास्त फेटल्याने क्रिम पिवळसर होवून त्यातील स्निग्धांश (fat content) विलग होतो.
४) यामध्ये आता थंड आंब्याचा रस घालून लाकडी कालथ्याने फोल्ड करा. वेलचीपूड घालणार असल्यास आता घाला. किंवा त्याऐवजी तुम्हाला मँगो एसेन्स घालायचा असल्यास २ -३ थेंब घाला. निट मिक्स करा.
५) जर तुमच्याकडे आइसक्रिम मशिन असेल तर त्यात हे मिश्रण घालून घोटवा.
६) जर आईसक्रिम मशिन नसेल तर हे मिश्रण फ्रिझर सेफ प्लास्टिक किंवा फ्रिझर सेफ मेटलच्या भांड्यात घाला (बेकिंगसाठी जे मेटलचे भांडे वापरतात तेही चालेल). साधारण २ तास हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. नंतर फ्रिजरमधून काढा. आईसक्रिम भांड्याच्या कडेने सुटेस्तोवर थांबा. नंतर हे गोठलेले मिश्रण मिक्सरमध्ये काही मिनीटे ब्लेंड करा. परत भांड्यात ओतून १-२ तास फ्रिजमध्ये ठेवा. २ तासांनी परत मिक्सरमध्ये फिरवा. असे किमान ३ ते ४ वेळा करा म्हणजे आईसक्रिम स्मूथ लागेल.
टीपा:
१) रेडीमेड आमरसाऐवजी घरी बनवलेला हापूस आंब्याचा रसही वापरता येईल. फक्त आमरस चाळणीतून गाळून घ्यावा म्हणजे गुठळ्या किंवा आंब्यातील धागे निघून जातील. तसेच घरगुती आमरस वापरल्यास जास्त साखरही घालावी लागेल तेव्हा चव पाहून साखर घालावी.
२) भाजलेला खवाही आईसक्रिममध्ये वापरू शकतो. वरील प्रमाणासाठी १/२ ते १ कप खवा वापरावा.
३) बारीक चिरलेले बदाम पिस्ताही घालू शकतो.
४) ३-४ वेळा मिक्सरमध्ये मिश्रण ब्लेंड केल्याव शेवटी जेव्हा आईसक्रिम सेट करण्यास ठेवाल त्यावेळी आंब्याचे साल काढून बारीक तुकडे मिश्रणात घालू शकता, छान लागतात.
बदाम कुल्फी
साहित्य:
३ कप दुध (होल मिल्क)
१/४ कप ताजा मावा (साधारण ४ टेस्पून)
१/२ ते पाउण कप साखर
१/३ कप बदामाचे काप
२ टिस्पून कॉर्न फ्लोअर
१/२ टिस्पून वेलची पूड
चिमूटभर केशर
कृती:
१) बदामाची पूड करून घ्यावी. दूध गरम करून आटवावे. आटवतानाच ३-४ मिनीटांनी साखर घालावी.
२) साधारण अर्धे होईल इतपत आटवावे. आटवताना सारखे ढवळत राहावे ज्यामुळे दूध भांड्याच्या तळाला लागणार नाही.
३) मावा हाताने मोकळा करून घ्यावा. त्यातील गुठळ्या हाताने मोडाव्यात.
४) दोन टेस्पून गार दूधात कॉर्न फ्लोअर मिक्स करावे, हे दूध आटवलेल्या दूधात घालावे व ढवळावे. हळूहळू दुध घट्टसर होईल.
५) दुध घट्टसर झाले कि वेलची पूड, केशर, मावा दुधात घालावा. थोडे गरम करावे. सर्व निट मिक्स करावे. मिश्रण थोडे कोमट झाले कि कुल्फीपात्रात किंवा हिंडालियमच्या पात्रात मिश्रण ओतून फ्रिजरमध्ये सेट करण्यास ठेवावे.
६) कुल्फी घट्ट झाली सर्व्ह करावे.
१) बदामाची पूड करून घ्यावी. दूध गरम करून आटवावे. आटवतानाच ३-४ मिनीटांनी साखर घालावी.
२) साधारण अर्धे होईल इतपत आटवावे. आटवताना सारखे ढवळत राहावे ज्यामुळे दूध भांड्याच्या तळाला लागणार नाही.
३) मावा हाताने मोकळा करून घ्यावा. त्यातील गुठळ्या हाताने मोडाव्यात.
४) दोन टेस्पून गार दूधात कॉर्न फ्लोअर मिक्स करावे, हे दूध आटवलेल्या दूधात घालावे व ढवळावे. हळूहळू दुध घट्टसर होईल.
५) दुध घट्टसर झाले कि वेलची पूड, केशर, मावा दुधात घालावा. थोडे गरम करावे. सर्व निट मिक्स करावे. मिश्रण थोडे कोमट झाले कि कुल्फीपात्रात किंवा हिंडालियमच्या पात्रात मिश्रण ओतून फ्रिजरमध्ये सेट करण्यास ठेवावे.
६) कुल्फी घट्ट झाली सर्व्ह करावे.
चोकलेट आईस्क्रीम
साहित्य : १ डबा मिल्क पावडर , १ कप पाणी , १ कप क्रीम , १/२ चमचा व्हानीला इसेन्स , ५० ग्रम चोकलेट
कृती : १ कप गरम पाण्यात चोकलेट विरघळून घ्या . गार झाल्यावर फ्रिझमध्ये ठेऊन गार करा क़्रिम खूप फेटून घ्या . नंतर वरील मिश्रणात घाला . इसेन्स घाला , सर्व मिश्रण ढवळून फ्रिझमध्ये गार व्हायला ठेवा . सेट झाल्यावर वाढ .
कृती : १ कप गरम पाण्यात चोकलेट विरघळून घ्या . गार झाल्यावर फ्रिझमध्ये ठेऊन गार करा क़्रिम खूप फेटून घ्या . नंतर वरील मिश्रणात घाला . इसेन्स घाला , सर्व मिश्रण ढवळून फ्रिझमध्ये गार व्हायला ठेवा . सेट झाल्यावर वाढ .
फालूदा
साहित्य :
- २ कप व्हॅनिला आईस्क्रिम
- १ कप फालूदा शेव
- गुलाबाचे सरबत
- अर्धा कप ताजे क्रीम
- १ किलो दूध
- २ छोटे चमचे गुलाब एसेंस
- १/२ कप बदाम व पिस्ते
- चार चमचे साखर
कृती :
दूधात साखर टाकून आटवा. थंड झाल्यावर त्यात गुलाब एसेंस टाकून जमवा.वाढतांना एक आईस्क्रिम ग्लासात गुलाब सरबत टाकून मग फालूदा शेवया टाका त्यावर जमवलेले दूध टाका.
मग व्हॅनिला आईस्क्रिम टाका व क्रीम टाकून वर बदाम पिस्ते टाका.
किंवा यामध्ये तुम्हाला आवडणारा आईस्क्रीम फ्लेवर, इसेंस घालून त्याची चव वाढवू शकता.
शाही फालुदा
साहित्य : रोझ सरबत, दुध, साय, सब्जाचे बी, जाड शेवया, बदाम, काजु, बेदाणे, व्हॅनिला आईस्क्रीमकृती: प्रथम दुधात रोझ सरबत घालून थोडी साय टाकून मिश्रण मिक्सर मधून फिरवून घ्यावे व थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवावे. सब्जाचे बी पाण्यात भिजत घालावे. शेवया उकडून त्या थोड्या केशर पाण्यात भिजवून घ्याव्यात. बदाम व काजू किसून घ्यावेत.
ग्लास मध्ये फालुदा बनवताना पहिल्यांदा शेवया टाकाव्यात. त्यावर सब्जाचे बी टाकावे. नंतर त्यात अर्धा ग्लास भरेल इतका रोझ मिल्कशेक टाकावा. त्यावर किसलेले बदाम व काजु टाकावेत. त्यावर व्हॅनिला आईस्क्रिम टाकावे. वरुन पुन्हा रोझ मिल्कशेक टाकावा. वरुन थोडेसे रोझ सिरप आणि बेदाणे टाकून खायला (का प्यायला) द्यावे.
चिकू आईस्क्रीम
- १ लिटर साईसकट दूध
- १ मोठा चमचा (व्हॅनिला) कस्टर्ड पावडर
- ४ मोठे किंवा ६ लहान चिकू
- दीड वाटी साखर
- पाव चमचा केशर (चुरलेले)
कृती :
बर्फाच्या कप्प्यात ठेवावे. जरा दाट झाले की बाहेर काढून पुन्हा घुसळावे किंवा काट्याने फेसावे. पुन्हा ट्रेमध्ये ओतून फ्रीजमध्ये बर्फाच्या कप्प्यात ठेवावे. हे आईस्क्रीम गुळगुळीत व्हायला हवे. खायला देताना वरून तोडीशी घोटलेली साय किंवा कुस्करलेला खवा किंचित भुरभुरवा. गोड बुंदी किंवा चमचाभर शेवयांची खीर वरून घातली तरी चांगली लागते व चांगली दिसते.
लस्सी
साहित्य : मलईचे दही, साखर, मीठ, गुलाबाचे पाणी, बर्फ.कृती : दह्यात पाणी, साखर व चवीपुरते मीठ घालून मिक्सरमध्ये घुसळून घ्यावे. नंतर ग्लास मध्ये पिण्यात देताना वर थोडी साय व गुलाबाचे पाणी व बर्फ घालावे.
सिताफळ आइस्क्रीम
साहित्य ः 2 लिटर दूध, एक किलो सिताफळ, एक वाटी साखर, एक वाटी क्रीम, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, दोन चमचे चायनाग्रास
कृती ः सिताफळे सोलून घ्यावीत. दूध आटवून एक लिटर करावे. अर्धी वाटी थंड दूध घेऊन त्यात कॉर्नफ्लोअर व चायनाग्रास मिसळून उकळत्या दुधात ओतावे. चांगले उकळल्यावर गॅस बंद करावा व साखर घालावी. दूध थंड झाल्यावर सिताफळाचा सोललेला अर्धा गर व क्रीम मिक्सरमधून काढून एकत्र करावे. त्यात सोललेला अर्धा उरलेला गर न वाटताच घालावा व चमच्याने ढवळून ऍल्युमिनिअमच्या भांड्यात ओतून फ्रिजरमध्ये सेट व्हायला ठेवावे. सेट झाल्यावर पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यावे. फ्रिजरमध्ये पुन्हा ठेवावे. 3-3 तास ठेवावे. पूर्ण सेट झाल्यावर सर्व्ह करावे.
अंजीर आइस्क्रीम
साहित्य ः 2 लिटर दूध, 20 अंजीर, एक वाटी क्रीम, एक वाटी साखर, चायनाग्रास व कॉर्नफ्लोअर प्रत्येकी 2 चमचे, थोडा गुलाबी रंग.
कृती ः दूध आटवून एक लिटर करावे. थंड दुधात कॉर्नफ्लोअर व चायनाग्रास मिसळून उकळत्या दुधात मिसळावे. दूध थंड झाल्यावर थोड्या दुधात अंजिराचे बारीक तुकडे करून भिजत घालावेत. मिक्सरमधून प्रथम अंजिराचे तुकडे व क्रीम घालून वाटावे. नंतर आटलेले सर्व दूध मिक्सरमधून काढावे. त्यात एक-दोन थेंब गुलाबी रंग घालावा. अंजिराचे तुकडे न वाटताच घालावेत व आइस्क्रीम
सेट करण्यास फ्रिजरमध्ये ठेवावे. आठ तासांनी सर्व्ह करावे.
अननसाचे आइस्क्रीम
साहित्य ः एक अननस, दोन वाट्या क्रीम, अर्धी वाटी साखर, दोन थेंब पायनॅपल इसेन्स, तीन मोठे चमचे दूधपावडर, एका लिंबाचा रस, सजावटीसाठी जॅम.
कृती ः प्रथम अननस सोलून त्याचे तुकडे करून मिक्सरमधून पल्प तयार करा. साखर-दूध पावडरमध्ये मिसळा व पल्पमध्ये मिसळून सेट व्हायला ठेवा. आइस्क्रीम अर्धवट सेट झाल्यावर बाहेर काढून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या. एका भांड्यात क्रीम घेऊन त्यात लिंबाचा रस व इसेन्स घालून चांगले फेटा व आइस्क्रीममध्ये घालून एकजीव करा. पुन्हा फ्रिजरमध्ये सेट करण्यास ठेवा. जॅमने सजवून खाण्यास द्या.
स्ट्रॉबेरी आइस्क्रीम
साहित्य ः एक लिटर दूध, अर्धी वाटी साखर, दीड वाटी चिरलेली स्ट्रॉबेरी, अर्धी वाटी क्रीम, एक चमचा प्रत्येकी चायनाग्रास व कॉर्नफ्लोअर.
कृती ः चिरलेली स्ट्रॉबेरी घेऊन त्यात साखर घालून गॅसवर पॅनमध्ये ठेवावे. त्यातील पाणी सुकेपर्यंत आटवावे व जाडसर रस झाल्यावर गॅस बंद करावा. दूध उकळताना थोड्या थंड दुधात कॉर्नफ्लोअर व चायनाग्रास मिसळून उकळत्या दुधात ओतून ढवळत राहावे. दूध आटवून निम्मे झाल्यावर गॅस बंद करावा. नंतर स्ट्रॉबेरी रस व दूध दोन्ही थंड झाल्यावर एकत्र करून क्रीम घालावे व सर्व मिक्सरमधून फिरवून घ्यावे. 7-8 तास फ्रिजरमध्ये सेट करावे.
ग्रेपर्ड आइस्क्रीम
साहित्य ः 500 ग्रॅम द्राक्षे, 500 ग्रॅम दही, एक पेला साखर, अर्धा पेला दुधाची पावडर, अर्ध्या लिंबाचा रस, पाव पेला क्रीम.
कृती ः प्रथम द्राक्षे धुऊन मिक्सरमधून पल्प तयार करा व गाळून घ्या. दही पातळ कपड्यात बांधून दोन तास टांगून ठेवा. पाणी निथळून गेलेले दही कपड्यातून काढा, व त्यात पिठीसाखर, दुधाची पावडर, लिंबाचा रस व द्राक्षांचा पल्प घालून सेट होण्यास ठेवा. 3 तासांनी अर्धवट झालेले आइस्क्रीम बाहेर काढा व मिक्सरमधून फिरवून घ्या. पुन्हा सेट होण्यास ठेवा. सर्व्ह करताना द्राक्षे लावून सजवा.
ऑरेंज आइस्क्रीम विथ फ्रूट क्रीम
साहित्य ः सहा संत्री, दीड पेला क्रीम, एक मोठा चमचा पिठीसाखर, दोन थेंब व्हॅनिला इसेन्स, एक पेला संमिश्र फळे, अर्ध्या लिंबाचा रस, एक मोठा चमचा मध.
कृती ः संत्री सोलून ज्यूसरमधून रस काढून घ्या. अर्धा मोठा चमचा पिठीसाखर, मध व लिंबाचा रस मिसळून सेट होण्यासाठी वेगवेगळ्या ग्लासात ठेवा. क्रीममध्ये अर्धा चमचा पिठीसाखर व व्हॅनिला इसेन्स घालून मिसळा. प्यायला देताना ग्लास फ्रिजरमधून बाहेर काढा. काट्याने आइस्क्रीमथोडे सैल करा. त्यावर क्रीमचे पफ ठेवा व फळांनी सजवून सर्व्ह करा.
शहाळ्याचे आइस्क्रीम
साहित्य ः अर्धा लिटर दूध, पाव वाटी साखर, एक वाटी शहाळ्याची मलई, सजावटीसाठी स्ट्रॉबेरी.
कृती ः प्रथम दूध उकळत ठेवावे. त्यात साखर घालून उकळून थंड करून ठेवावे. शहाळ्याची मलई गार झालेल्या दुधात घालावी. मिक्सरमधून फिरवावे. नंतर फ्रिजमध्ये सेट करण्यास ठेवावे. सर्व्ह करताना स्ट्रॉबेरीने सजवावे.
पपई आइस्क्रीम
साहित्य ः दूध अर्धा लिटर, दोन वाट्या क्रीम, एक चमचा कॉर्नफ्लोअर, दोन वाट्या पपई गर, साखर दोन वाट्या, मिक्स फ्रूट इसेन्स एक चमचा.
कृती ः दुधात साखर व कॉर्नफ्लोअर घालून उकळून थोडे घट्ट करावे. थंड झाल्यावर क्रीम, पपईचा गर घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. फ्रिजरमध्ये सेट होण्यास ठेवावे. तासभराने बाहेर काढून पुन्हा इसेन्स घालून पुन्हा फिरवावे. परत सेट करण्यास ठेवावे.
सहज सोपे आईस्क्रीम
साहित्य -मिल्कमेड / कंडेन्स मिल्क - १ पूर्ण डबा
म्हशीचे गाढ मलईदार निरसे दूध - १/२ लिटर
हापूस आंब्याचा गर - ३ मोठे नग [ साधारणतः २ मोठ्या वाट्याभरून होईल इतका ]
कृति -
पुरेश्या आकाराचे भांडे / डबा फ्रीजरमधे ठेवा, फ्रीज ६ ला किंवा नेहमीपेक्षा तिप्पट सेटींगला ठेवा, आंब्याचा गर चाळणीतून गाळून दशा पूर्णपणे काढून टाका, दूध ब्लेंडरमधे मिनीटभर घुसळा, त्यात मिल्कमेड घालून मिनीटभर घुसळा, नंतर आंब्याचा गर घालून मिनीटभर घुसळा, भांडे फ्रीजबाहेर काढून त्यात मिश्रण भरा, भांडे नीट झाकून फ्रीजरमधे ठेवा, अंदाजे ५-६ तासात आईस्क्रीम तयार होईल.
[ यात आंब्याऐवजी स्ट्राॅबेरी, अॅप्रिकाॅट, चिकू, इ. फळे देखील वापरता येतात. ]
फ्रुट योगर्ट आईस्क्रीम
साहित्य-
१. आंबा २
२. केळे १
३. दही (आंबट नसलेले) ३ वाट्या
४. साखर ६ चमचे
५. काजू ५
६. बदाम ४
कृती-
आंबा व केळ्याचे साल काढून तुकडे करून फ्रीजर मध्ये ठेवावे. दही फडक्यात घेऊन त्यातील पाणी काढून टाकावे. थोडेसे दाबून घ्यावे. आंबा व केळे कडक झाल्यावर मिक्सर मध्ये त्यातील संपूर्ण केळे व दीड आंबा घेऊन त्यात दही, साखर टाकून फिरवावे. त्यात बदाम व काजूचे तुकडे मिक्स करून हे मिश्रण परत फ्रीजर मध्ये सेट करायला ठेवावे. सेट झाल्यावर सेर्व्हिंग प्लेट मध्ये काढून त्यावर उरलेला आंबा अर्धा सेंटीमीटर प्रमाणे बारीक चिरून त्यावर टाकावा. वाटल्यास थोडे काजू, बदाम सजवण्याकरिता टाकावे.
केशर पिस्ता आईस्क्रीम
साहित्य
१ लिटर दुध
३.५ वाटी क्रीम
१ वाटी पिस्ता
२ वाटी साखर
१/४ चमचा केशर
कृती
१ कप लिंबाचा रस (साधारण १२ मोठी रसाची लिंबं)
अडीच कप साखर
३/४ कप पाणी
२ टिस्पून मिठ
कृती:
१) लिंबाचा रस गाळून घ्यावा म्हणजे बिया आणि लिंबाचा किंचीत राहिलेला गर निघून फक्त लिंबाचा रस उरेल.
२) अडीच कप साखर आणि ३/४ कप पाणी एका पातेल्यात एकत्र करावे. गोळीबंद पाक करावा (महत्त्वाची टिप).
३) पाक तयार झाला कि गॅस बंद करावा. तयार पाकात लिंबाचा रस घालून ५ मिनीटे ढवळावे. नंतर जरा निवेस्तोवर अधूनमधून ढवळावे.
४) तयार लिंबू सरबत काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवावा.
लिंबाचे सरबत करताना १ ग्लासभर लिंबाचे सरबत बनवायचे असल्यास, एका ग्लासमध्ये २ मोठे चमचे लिंबाचा पाक घालावा, गार पाणी घालावे आणि मिक्स करावे. मिठाची गरज लागल्यास किंचीत मिठ घालावे. तसेच बर्फही घालू शकतो.
टीप:
१) लिंबाच्या सरबतात चिमूटभर वेलचीपूड घातली तरी छान फ्लेवर येतो.
२) गोळीबंद पाक म्हणजे पाकाचा थेंब गार पाण्यात टाकल्यावर टणक गोळी तयार झाला पाहिजे. पण लिंबू सरबताला मऊसर गोळी (Soft Ball Consistency) तयार झाली तरीही चालेल.
घटक - आवळा, आलं, पाणी आणि साखर.
साहित्य- १ किलो ताजी लाल कोकम, अडीच किलो साखर, चमचा जीरेपूड, २ चमचे मीठ.
१ लिटर दुध
३.५ वाटी क्रीम
१ वाटी पिस्ता
२ वाटी साखर
१/४ चमचा केशर
कृती
- अर्धा लिटर दुध साखर घालुन मिक्सर मध्ये घुसळून घेणे.
- एका भांड्यात एक कप दुध घेवून उकळवणे. त्यात केशर घालुन चांगले पिवळे होईपर्यंत हलवणे.
- उरलेले दुध व केशर घातलेले दुध गोड केलेल्या दुधात घालुन चांगले एकत्र करणे.
- मिक्सरमध्ये पिस्ता पूड करून घेणे व दुधात घालणे.
- दुधात क्रीम घालुन चांगले एकत्र करणे. मिश्रण फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी एक तास भर ठेवणे.
- मिश्रण आईस्क्रीममेकरमध्ये घालुन सेट करणे
बटरस्कॉच
आईसक्रीम
साहित्य:
एक रेसिपी बेसिक आईसक्रीम,
साय,
आक्रोड-बदाम-काजूचे बारीक तुकडे (पूड नाही),
साखर
, बटर वा तूप,
बटर स्कॉच फ़्लेवर १ टीस्पून आणि
अर्धा टीस्पून लेमन यलो कलर.
कृती:
प्रथम
३/४ कप ड्रायफ़्रूटचे तुकडे चमचाभर तुपावर परतून घ्या. त्यात साधारण १/२ कप साखर
घालून शिजवा, कॅरेमल होईल. मग चिक्की सारखे ताटलीत ओता, वाटीला तूप लावून पसरा आणि
काढून अर्धवट कुटून घ्या.
फ़ूड
प्रोसेसर मध्ये बेसिक आईसक्रीम, साय, फ़्लेवर आणि रंग घालून मिक्स करुन घ्या. हे
थोडे मिश्रण प्लास्टिकच्या डब्यात ओता, त्यावर चिक्कीची पूड घाला. मग परत मिश्रण
परत चिक्कीपूड असे घाला.
सहा ते
आठ तासात बटर स्कॉच आईसक्रीम तयार.
तयार
कोन मध्ये ही आईसक्रीम सर्व करता येतील वा फ़ळांसोबत (बनाना स्प्लिट, फ़्रूट सलाड
विथ आईसक्रीम) देखील देता येतील. कोल्ड कॉफ़ी विथ वॅनिला आईसक्रीम, फ़ालुदा यासाठी
पण या आईसक्रीम्स चा उपयोग करता येईल.
साहित्य:
ही आइसक्रीम मी अनेक वर्षे करत होते.
अगदी एखाद्या पार्टीसाठी पाच सहा लिटरचे आइसक्रीम करणे देखील फ़ारसे अवघड नाहीये. थोड्या सवयीने आपण यातील रंग, फ़्लेवर्स,साखर यांचे प्रमाण कमी जास्त करु शकतो आणि
आपल्याला अगदी आवडेल अशी चव मिळवू शकतो.
लिंबाचे टिकाऊ सरबत
१ कप लिंबाचा रस (साधारण १२ मोठी रसाची लिंबं)
अडीच कप साखर
३/४ कप पाणी
२ टिस्पून मिठ
कृती:
१) लिंबाचा रस गाळून घ्यावा म्हणजे बिया आणि लिंबाचा किंचीत राहिलेला गर निघून फक्त लिंबाचा रस उरेल.
२) अडीच कप साखर आणि ३/४ कप पाणी एका पातेल्यात एकत्र करावे. गोळीबंद पाक करावा (महत्त्वाची टिप).
३) पाक तयार झाला कि गॅस बंद करावा. तयार पाकात लिंबाचा रस घालून ५ मिनीटे ढवळावे. नंतर जरा निवेस्तोवर अधूनमधून ढवळावे.
४) तयार लिंबू सरबत काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवावा.
लिंबाचे सरबत करताना १ ग्लासभर लिंबाचे सरबत बनवायचे असल्यास, एका ग्लासमध्ये २ मोठे चमचे लिंबाचा पाक घालावा, गार पाणी घालावे आणि मिक्स करावे. मिठाची गरज लागल्यास किंचीत मिठ घालावे. तसेच बर्फही घालू शकतो.
टीप:
१) लिंबाच्या सरबतात चिमूटभर वेलचीपूड घातली तरी छान फ्लेवर येतो.
२) गोळीबंद पाक म्हणजे पाकाचा थेंब गार पाण्यात टाकल्यावर टणक गोळी तयार झाला पाहिजे. पण लिंबू सरबताला मऊसर गोळी (Soft Ball Consistency) तयार झाली तरीही चालेल.
आवळा सरबत
घटक - आवळा, आलं, पाणी आणि साखर.
कृती - आवळा व आलं किसून रस पिळून काढावा. १ वाटीच्या मिश्रणास दोन वाटी साखर आणि एक वाटी पाणी घ्यावं. पाणी व साखर एकत्र उकळून घ्यावं. उकळी येऊन फेस शांत झाला आणि मिश्रण स्वच्छ दिसू लागलं की गॅस बंद करावा. त्यात तयार केलेलं मिश्रण टाकून ते चांगलं ढवळावं. सरबताचं हे सिरप गाळून कोरड्या बरणीत भरून ठेवावं. आवडत असल्यास त्यात खाण्याचा हिरवा रंग टाकला तरी चालेल.
उपयोग - पित्तशामक, तृष्णा शमविणारं, मळमळ, तोंडाला चव नसणं, थकवा येणं या तक्रारीत उपयोगी.
कोकम सरबत
साहित्य- १ किलो ताजी लाल कोकम, अडीच किलो साखर, चमचा जीरेपूड, २ चमचे मीठ.
कृती- कोकम स्वच्छ धुवून पुसून आतला बियांचा भाग काढावा. तयार झालेल्या वाट्यांमध्ये साखर भरून ती मोठ्या काचेच्या बाटलीत अधेमधी साखरेचा थर देऊन भरावी. रोज बाटलीतील कोकम खालीवर हलवावी. सर्व साखर विरघळली की, कोकमांचा अर्क गाळून घेऊन त्यात मीठ व जिरेपूड घालून सिरप बाटलीत भराव. जरुरीनुसार पाण्यात मिसळून सरबत तयार करावं. ह्यात प्रिझर्वेटिव्ह जरूर नसते.
खस सरबत
साहित्य-
- ५० ग्रॅम खसच्या काड्या
- २ कि. साखर
- १ लि. पाणी
- २ लहान चमचे खस एसेंस
- २ लहान हिरवे रंग
- १/२ चमचा पोटेशियम मेटा बाय सल्फेट
कृती-
खस काड्या पाण्यात ८-१० तास भिजवून ठेवावे. नंतर पाणी गाळून घ्या.
या पाण्यात साखर घालून पाक तयार करा.
एका तारेचा पाक झाल्यावर गॅस बंद करा. पाक थंड होऊन द्या.
थंड झाल्यावर त्यात रंग, एसेंस, व पोटेशियम मेटा बाय सल्फेट मिसळून बाटलीत भरून घ्या.
सर्व्ह करण्यापूर्वी हलवून ग्लासात अगोदर पाणी, बर्फ व थोडे सरबत मिसळावे.
चिंचेचे सरबत
साहित्य-
अर्धी वाटी चिंच- २ वाट्या चिरलेला पिवळा गुळ
- १ चमचा जीरे पावडर
- मीठ
कृती-
चिंच रात्री भिजत घालून सकाळी कोळून व गाळून घ्यावी.
त्यात गूळ मिसळून फ्रिजमध्ये ठेवावी.
सरबत देताना ग्लासमध्ये थोडेसे मिश्रण गार पाण्यात घालावे.
चवीप्रमाणे मीठ व जिरे पूड घालावी.


No comments:
Post a Comment